नवी दिल्ली – भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने येथे झालेल्या डायमंड लीग स्टॉकहोम येथील फेरीत नवा विक्रम साकार केला. त्याने या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात गत स्पर्धेची कामगिरी मागे टाकली.
स्वीडनमध्ये सुरू असलेल्या डायमंड लीगच्या स्टॉकहोम फेरीत 89.94 मीटरचे अंतर नोंदवत नवीन राष्ट्रीय विक्रम साकार केला. नीरजने 89.30 मीटरचे अंतर नोंदवताना अवघ्या 16 दिवसांत गेल्या स्पर्धेतील कामगिरी मागे टाकली. ही कामगिरी करताना त्याने तुर्कस्तानमधील पावो नुरमी स्पर्धेत साकार केला होता.
नीरजने स्टॉकहोम स्पर्धेत 84.37 मीटर भाला फेकत दुसरा क्रमांक पटकावला. अँडरसन पीटरसन 90 मीटर अंतर नोंदवत पहिल्या स्थानी आहे. त्याने 90.31 मीटर लांब भाला फेकला. टोकिओ ऑलिम्पिकनंतर नीरजचा हा दुसरा सामना आहे. तो टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. स्टॉकहोममध्ये सहभाग घेत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय खेळाडू आहे.