मुंबई – ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या नातवाचे अर्थात सनी देओलचा मुलगा करण देओल याचा काही दिवसांपूर्वीच विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. देओल परिवार या लग्नाला उपस्थित राहीला होता. मात्र धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली या लग्नाला उपस्थित राहिल्या नव्हता. त्यानंतर ईशा देओलने भावासाठी एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर धर्मेंद्र यांनी ही एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
धर्मेंद्र यांनी इनस्टाग्राम अकाऊंटवर ईशा आणि त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, “इशा, अहाना, हेमा आणि माझी सर्व प्रेमळ मुलं… तख्तानी आणि वोहरा यांच्यावर मी खूप प्रेम करतो आणि मनापासून तुम्हा सर्वांचा आदर करतो. वय आणि आजारपण मला सांगतंय की मी तुमच्याशी खासगीत बोलू शकलो असतो पण..’, असे म्हणत धर्मेंद्र यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
धर्मेंद्र आता 87 वर्षांचे असून अनेकदा तब्येतीमुळे त्यांना फार बाहेर जाणे शक्य होतनाही. मात्र करणच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. धर्मेंद्रसुद्धा त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत लग्नाला उपस्थित होते. मात्र हेमालिनी उपस्थित राहिल्या नव्हत्या. दरम्यान, धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी , बॉबी दोन मूल तर विजीता आणि अजीता या दोन मुली आहेत. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना ईशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत.