नवी दिल्ली – देशात गेल्या चोवीस तासात तब्बल 39 हजार 726 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. यावर्षातील एक दिवसातील उच्चांकी रुग्णसंख्या आहे. या आकडेवारीसह देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 15 लाख 14 हजार 331 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासात 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1,59,370 झाली आहे. भारतात सध्या 2,71,282 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,10,83,679 जण बरे झाले आहेत. आजपर्यंत 3 कोटी 93 लाख 39 हजार 817 जणांना करोनाविरोधी लस टोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारूनुसार, करोना व्हायरस बाधितांमध्ये सलग नवव्या दिवशी वाढ झाली आहे. देशात आता 2,71,282 रुग्ण उपचार घेत आहेत. सकाळी आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एक दिवसातील 39,726 रुग्णांची संख्या 110 दिवसांतील सर्वात जास्त आहे. तर 154 जणांच्या मृत्यूनंतर आता मृतांची संख्या वाढून 1,59,370 झाली आहे.