खळबळ : 20 मुले युपीमध्ये ओलीस

गुन्हेगाराचे कृत्य; पोलिसांवर गोळीबार, तीन कर्मचारी जखमी
फारूकाबाद ( उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील फारूखाबादमध्ये एका गुन्हेगाराने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून 20 मुलांना ओलीस ठेवले. त्याने मुलांच्या सुटकेसाठी आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. त्याने कमी स्फोटके असलेले बॉम्ब फेकल्याचे सांगण्यात येत आहे. यात तीन पोलिस जखमी झाले असून दहशतवादी विरोधक पथक तैनात करण्यात आले आहे.

सुरेश बाथम असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याने मुलांना का ओलीस ठेवले त्याचे कारण समजू शकले नाही. त्याच्या घरातून मुलांना नेण्यासाठी स्थानिकांनी दार ठोठावले. त्यावेळी त्यांनी त्याने घरातून गोळीबार सुरू केला. त्यात तीन पोलिस जखमी झाले. त्याने घरातून काही बॉम्ब फेकल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

या ओलिस ठेवलेल्या मुलांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावर वरीष्ट पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. आम्हाला कानपूर विभागाच्या पोलिस महानिरीक्षकांना घटनास्थळावर जाण्याचे आदेश दिले आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कमांडोंचे पथक पाठवण्यात आले आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. मुलांना वाचवण्याला आमचे प्राधान्य असेल, असे पोलिस महासंचालक ओमप्रकाश सिंह यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य सरकारच्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. नेमक्‍या किती जणांना ओलीस ठेवले याची नेमकी संख्या समजू शकली नाही. ग्रामस्थांनी सुमारे 20 ते 25 मुले आत असल्याचे सांगितले. या गुन्हेगाराची मुले आणि पत्नी आत असल्याचे सांगितले.

हा मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न आहे. आम्ही परिस्थिती काळजीपुर्वक हाताळत आहोत. थोड्याच वेळात दहशतवादी प्रतिबंधक पथक येथे पोहोचेल. मुलांची सुटका आणि गुन्हेगाराला अटक याला आमचे प्राधान्य असेल. त्याचे मानसिक संतुलन ढळले असावे. कारण त्याने मुलांच्या सुटकेसाठी कोणतीही अट ठेवली नाही. त्याने आम्हाला स्थानिक आमदाराला फोन करायला सांगितले त्या प्रमाणे आम्ही केला आहे, असे पोलिस माहनिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.