नुकत्याच चालू झालेल्या झी मराठी वरील कार्यक्रम ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ मध्ये आबासाहेब गरवारे महाविद्यालय मधील
‘सुशांत दिवेकर’ ह्या विद्यार्थ्याची निवड झाली असून तो आता झी मराठी सारख्या प्रसिद्ध टी व्हीं चैनल वरती झळकताना दिसत आहे. तो आत्ता बी.ए. सायकॉलजीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. सुशांतने ऑडिशन देऊन,मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवले आहे.
ह्या आधी देखिल सुशांत ‘एक टप्पा आऊट’ ह्या स्टार प्रवाह वरील मालिकेत झळकला होता. सुशांतने काॅलेज मध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सतत सक्रीय राहून आपला एक चाहतावर्ग तयार केला आहे. आता त्याच्या कॉलेज मधील मित्रांना व चाहत्यांना त्याच्या सादरीकरणाची उत्सुक्ता लागून राहिली आहे.
– रोहित गुळवणी
कालेज रिपोर्टर,
आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे.