अंकारा – तुर्कीयेच्या राजधानीमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटानंतर देशभरातील कुर्दिश बंडखोरांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान आतापर्यंत एक हजार जणांना तुर्कीयेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. तुर्कीयेच्या पोलिसांनी मंगळवारी तुर्कियेमध्ये कुर्दिश अतिरेक्यांशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या किमान 67 लोकांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी 16 तुर्की प्रांतांमध्ये छापे टाकले आणि 55 लोकांना बंदी घातलेल्या कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या (पीकेके) गुप्तचर गटाशी संबंधित असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले. तर अन्य पाच प्रांतामध्ये घातलेल्या छाप्यांमध्ये आणखीन 12 जणांना ताब्यात घेतले गेले आहे. तर विना परवाना बंदुक बाळगल्याचा किंवा बंदुकांच्या तस्करीत संबंधित असलेल्या 928 जणांना या कारवाईदरम्यान अटक करण्यात आली.
आहे. कारवाई दरम्यान 840 हून अधिक बंदुका जप्त करण्यात आल्या, असे गृहमंत्री अली येर्लिकाया यांनी सांगितले. मात्र शस्त्र परवाना नसल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या या सर्वांचा “पीकेके’शी संबंध आहे का नाही, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
कुर्द बंडखोरांच्या “पीकेके’ या संघटनेच्या कारवाया दशकभरापासून तुर्कीयेमध्ये सुरू आहे. या संघटनेकडून 1984 मध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि युरोपीय संघाने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.