नवी दिल्ली – भारतात एका दिवसात करोनाचे 8 हजार 439 नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्णांबरोबर देशातील संक्रमितांची संख्या 3,46,56,822 वर पोहोचली आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 93 हजार 733 वर आली आहे. जे 555 दिवसांतील सर्वात कमी आहे.
India reports 8,439 new #COVID19 cases, 9,525 recoveries, and 195 deaths in the last 24 hours
Active cases: 93,733
Total recoveries: 3,40,89,137
Death toll: 4,73,952Total vaccination: 129.5 crore doses pic.twitter.com/h8SheZoVDD
— ANI (@ANI) December 8, 2021
बुधवारी सकाळी ८ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, करोना संसर्गामुळे आणखी 195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या 4,73,952 वर पोहोचली आहे. देशात सलग 12 दिवसांपासून करोनाचे दैनंदिन रुग्ण 10 हजारांपेक्षा कमी राहिले आहेत. ही दिलासादायक बाब आजच्या आकडेवारूमधून समोर आली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 93 हजार 733 वर आली आहे, जी संसर्गाच्या एकूण प्रकरणांच्या 0.27 टक्के आहे. हा दर मार्च 2020 नंतरचा सर्वात कमी आहे.