नवी दिल्ली – सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉल यांच्याशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची आतापर्यंत
अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, याच प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी आज (दि. ८) जॅकलिन दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात हजर झाली आहे.
Actor Jacqueline Fernandez appears before Enforcement Directorate (ED) at its office in Delhi in connection with Rs 200 crore extortion case involving conman Sukesh Chandrasekhar pic.twitter.com/LNd6v5qs2y
— ANI (@ANI) December 8, 2021
चंद्रशेखर याने जॅकलिन हिला अनेक उंची भेटवस्तू दिल्या होत्या. त्यामध्ये ९ लाख रुपयांची पर्शियन मांजरी आणि ५२ लाख रुपये किंमतीच्या एका घोड्याचाही समावेश आहे.
सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारियासह इतर ६ जणांविरुद्ध ईडी कडून तब्बल ७००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या आरोपपत्रात जॅकलिनसोबतच अभिनेत्री नोरा फतेही हिचा सुद्धा उल्लेख आहे. सुकेशने नोराला अतिशय महागडी कार गिफ्ट केली होती.