Pune News : पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे दुचाकी ढकलत आंदोलन

पुणे – भाजप सरकारने वाढविलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरनाविरोधात घोषणाबाजी करत दुचाकी वाहने ढकलत नेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

देशातील जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रित करण्याचे काम केंद्र सरकारचे असते पण आपले केंद्र सरकार फक्त आपली सरकारे स्थापन करण्यात व्यस्त आहेत त्यांना वाढत्या महागाई विषयी काही देणं घेणं राहिलेले नाही. भाजप सरकारचे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे, शहराध्यक्ष महेश हांडे, प्रदेश पदाधिकारी अभिषेक बोके, मयूर गायकवाड, वृक्ष सवर्धन समिती सदस्य मनोज पाचपुते, शहर पदाधिकारी रुपेश संत, किरण खैरे, अमोल ननावरे, अविनाश भांड, प्रमोद शिंदे, अजिंक्य पालकर, गजानन लोंढे, सागर खांदवे, राकेश मारणे, प्रशांत प्रभाळे, आकाश पाटणकर, शरद दबडे, अच्युत लांडगे, स्वप्नील थोरवे,सिधू बनकर, उमेश कोंढाळकर, विकी वाघे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.