मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने “मिशन 2022′ हाती घेतले आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आतापासूनच तयारीला लागली आहे.
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक 8 वरुन 60 झाले पाहिजेत, अशा सूचना अजित पवारांनी केल्या आहेत. मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने चुनाभट्टीतील सोमय्या मैदानावर आज कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर पार पडले.
या एकदिवसीय शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे सध्या आठ नगरसेवक आहेत, ते वाढून 50-60 झाले पाहिजेत. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे आजवर जास्तीत जास्त 14 नगरसेवक निवडून आले आहेत.
त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. वॉर्डात काम केले पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. महिन्यातला एक दिवस मुंबईला देणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले.