NCP VERDICT ECI – राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेत भाजपला पाठिंबा दिला होता. यानंतर दोन्ही नेत्यांनी पक्ष व चिन्ह आपल्याकडेच राहील अशी खात्री व्यक्त केली होती. मात्र निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव व निवडणूक चिन्ह घड्याळ अजित पवार यांना बहाल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी, शिवसेनेमध्ये देखील दोन गट पडले होते. एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेत भाजपला पाठिंबा दिला होता. यानंतर हा वाद देखील निवडणूक आयोगाकडे गेला होता. निवडणूक आयोगाने या वादात आपला कौल एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात टाकला होता.
अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही असेच काहीसे घडल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानत त्यांना निवडणूक चिन्ह वापरण्याचा देखील अधिकार दिला आहे. हा अजित पवार व त्यांच्या समर्थक आमदारांसाठी मोठा विजय मानला जातोय.
शरद पवार यांना मोठा धक्का | NCP VERDICT ECI
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवडणूक आयोगाच्या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. पुतणे अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेत सत्ताधारी बाकांवर बसणं पसंत केलं होत. यानंतर हा वाद सुरु झाला होता. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिल्याने अजित पवार यांचा पुढील मार्ग आता सुकर झाला आहे. शरद पवार यांच्या अडचणींमध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे.
बहुतांश आमदार अजित पवार यांच्या समर्थनार्थ
पक्षाचे बहुतांश आमदार हे अजित पवार यांच्या समर्थनात आहेत. शरद पवार यांनी देखील अजित पवार यांची भूमिका मान्य करत भाजपसोबत यावे अशी भूमिका या अजित पवार गटातील नेत्यांनी अनेकदा घेतली. याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चाही केली मात्र शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
बारामतीत देखील आव्हान देणार | NCP VERDICT ECI
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामती येथे लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी आपल्या विचारांचा उमेदवार लोकसभेत पाठवावा, ज्येष्ठांचे ऐकू नये असे आव्हान त्यांनी बारामतीकरांना केले होते. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.
बारामती येथून शरद पवार यांच्या कन्या व अजित पवार यांच्या बहीण सुप्रिया सुळे खासदार आहेत. यंदा अजित पवार आपला उमेदवार देणार असल्याने या जागेवर काय होत याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
‘हे गुंडांना संरक्षण देणारं आणि पोसणारं सरकार आहे’; विजय वडेट्टीवारांचा CM शिंदेंवर निशाणा
राहुल गांधींच्या ‘त्या’ व्यक्तव्यावर जरांगे म्हणाले; “आमचे आरक्षण मिळाल्यात जमा, ते बोलले खूप झाले…’