मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी दावा करणार ? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पुणे – राज्यात करोना संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तीन पक्षांचे सरकार आहे. तर मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. मात्र मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसने आपली इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर मोठ विधान केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पुणे जिल्हा परिषदेला भेट दिली. यावेळी त्या बोलत होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद ठेवण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाच वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, असं म्हटलं होतं. त्यामुळे या संदर्भात राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं.

खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदासाठी दावा करणार का, अस विचारण्यात आलं. त्यावर त्या म्हणाल्या की, पवार साहेबांनी सांगितलं आहे की, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे टिकणार आहे. एखाद्या विषयावर पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केली की, त्यावर आम्ही कोणी काही बोलत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.