#BreakingNews : तर ठरलंय…! पण महाशिवआघाडी’चा सस्पेन्स कायम

मुंबई: महाराष्ट्रात आता शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून चांगलाच गोंधळ सुरु होता. आज शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. शिवसेनेने सत्तास्थापनेवर दावा केला असून ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्याची वाट पाहत आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला होता पण मंत्रिपदाच्या वाटपावरून या दोघांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि दिवाकर रावते यांनी राज्यपालांची भेट घेतली

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, “आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण मिळाल्यानंतर आम्ही दिवसभर भाजपच्या भूमिकेची वाट पहिली. त्यानंतर आम्ही इतर पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांसोबत चर्चा केली. त्या दोन्ही पक्षात आता चर्चा सुरु आहे. आम्ही राज्यपालांना दोन दिवस वेळ वाढवून मागितली होती. मात्र आमची हि मागणी नाकारली असून आम्ही सत्ता स्थापनेवर दावा केला आहे”.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here