अकोला – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांना एका कार्यक्रमात व्यासपीठावर भाषण करताना अर्धांगवायूचा सौम्य झटका आल्याचे वृत्त काल समोर आले होते. याबाबत स्वत: अमोल मिटकरी यांनी त्यांच्या तब्बेतीविषयी माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी अर्धांगवायूचा कुठलाही झटका आला नसून तब्बेत ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.लवकरच जनसेवेत रुजू होईल.@NCPspeaks pic.twitter.com/Pscr6jr7K2
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 12, 2021
अमोल मिटकरी तब्बेतीविषयी माहिती देताना म्हणाले की, ”आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.लवकरच जनसेवेत रुजू होईल.”
दरम्यान, मिटकरी यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सुद्धा आवाहन केले आहे. हॉस्पिटलमधून फोटो शेअर करत अमोल मिटकरी यांनी ट्विटरद्वारे आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमादरम्यान अमोल मिटकरी हिंगणा येथे भाषण करत होते. मंचावर बोलत असताना अमोल मिटकरी यांचा आवाज बदलला आणि हावभाव बदल्यामुळे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल होते. यावेळी मिटकरींना अर्धांगवायूचा झटका आल्याचे वृत्त पसरले होते.