आर्यन खान प्रकरणानंतर मुंबईत पुन्हा एनसीबीचे छापे; दिवसभर सुरू होती छापेमारी

मुंबई – नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोने शनिवारी पुन्हा मुंबईत बांद्रा, अंधेरी, आणि पवई भागात छापेमारी केल्याचे वृत्त आहे. मादकद्रव्याच्या चोरट्या व्यापाराच्या विरोधात एनसीबीची सध्या मोठी कारवाई सुरू असून त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून ही छापेमारी करण्यात आली आहे.

काहीं विशेष माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीनुसार ही कारवाई केली जात आहे असे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले. छापेमारी सकाळी सुरू झाली आणि ती संध्याकाळपर्यंत सुरू होती.

गोव्याकडे जाणाऱ्या एका जहाजावर ड्रग पार्टी सुरू असल्याच्या कारणाने एनसीबीने तेथे छापेमारी करून शाहरुख पुत्र आर्यन सह अन्य काही जणांना अटक केल्यापासून त्यांच्याशी संबंधीत लोकांवर ही छापेमारी सुरू आहे. दरम्यान एनसीबीची ही कारवाई सुरू असली तरी त्यांच्याही कारवाईत विसंगती आणि हेतुपुरस्सरपणा होत असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक हे सातत्याने करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.