हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, NCB ऑफिस आहे : अनन्या पांडेवर भडकले वानखेडे

मुंबई : एनसीबी कार्यालयात उशिरा पोहोचलेल्या अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी चांगलंच फैलावर घेतलं. हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, हे NCB कार्यालय आहे’, अशा शब्दात समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला खडसावलं.

सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावलेली अनन्या एनसीबीच्या कार्यालयात दुपारी 2 वाजता गेली. यामुळे समीर वानखेडे यांचा चांगलाच पारा चढला.

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेचं नाव समोर आलं आहे. तिने आर्यन खानशी ड्रग्जसंबंधित व्हॉट्सअप चॅट केल्याचं समोर आलं आहे. याचप्रकरणी एनसीबी तिची चौकशी करत आहे. गुरुवारी अनन्या पांडेचं नाव समोर आल्यानंतर एनसीबीने थेट अनन्याचं घर गाठलं.

अनन्या पांडेला शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण अगोदरच्या दिवशी एनसीबीने सुमारे सव्वा दोन तास चौकशी केल्याने अनन्या अगोदरच डिप्रेशनमध्ये आली होती. ती खूपच भेदरलेली होती. त्यामुळे शुक्रवारी अकरा वाजताची वेळ असताना देखील ती चौकशीसाठी दुपारी 2 वाजता एनसीबी ऑफिसमध्ये पोहोचली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास अनन्याने वाट पाहायला लावली.

यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांना ताटकळत ठेवणाऱ्या अनन्या पांडेचा झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी चांगलाच समाचार घेतला. “तुला 11 वाजता बोलावलं होतं, तू दोन वाजता कशी काय येऊ शकतेस? प्रोडक्शन हाऊस समजलीस काय? अशा शब्दात समीर वानखेडे यांनी अनन्याला खडसावलं.

अनन्या पांडे ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या तावडीत अडकली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी एनसीबीने आर्यन खान ड्रग्स प्रकरणाबाबत अनन्या पांडेची 2 तास चौकशी केली. आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या गप्पांमध्ये आर्यन अनन्याशी एका ठिकाणी गांजाबद्दल बोलत होता. आर्यन विचारत होता की, काही जुगाड होऊ शकते का? यावर अनन्याने उत्तर दिले आणि सांगितले की, “मी व्यवस्था करीन”, असं चॅटमध्ये समोर आलंय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.