BIGGEST NEWS : अनन्या पांडेची कबुली : आर्यनला ड्रग्ज पुरवले, ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात नाही!

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेच्या चौकशीच्या दुसऱ्या फेरीत 4 तासांच्या चौकशीत, NCB ने ड्रग्ज पेडलर्सच्या कनेक्शन संदर्भात चौकशी केली आहे. नेमकी अनन्याने एनसीबी अधिकाऱ्यांना काय माहिती दिली आहे, त्याबाबतचा एक्सक्लुसिव्ह माहिती समोर आली आहे.

या दरम्यान, अनन्या पांडेने एनसीबीच्या चौकशी दरम्यान कबूल केले की, तिने आर्यन खानला वीड अर्थात गांजा दिला होता, पण ती कोणत्याही ड्रग पुरवठादार किंवा ड्रग्ज पेडलरशी संपर्कात नाही.

अनन्या पांडेने कबूल केले की, गेट टूगेदर दरम्यान तिने ट्राय करण्याच्या उद्देश्याने काही पफ्स घेतले होते. तिने ना ड्रग्स सप्लाय केले होते ना सेवन केले होते. कधी कधी मित्र मैत्रिणींचा गेट टूगेदर असतो, ज्यात ती शूटिंगवरूनच तिच्या मैत्रिणींसोबत लोकेशनवर जायची. आर्यन हासुद्धा अनेक गेट टुगेदरमध्ये असायचा. अनेकवेळा तिने त्याला वीड सेवन करताना पाहिलं आहे. पणतो वीड किंवा गांजा तिथे कसा आला, किंवा कोण घेऊन आलं याबाबत तिला काहीच माहिती नसल्याचा तिने एनसीबीला सांगितलं आहे.

एनसीबीच्या सूत्रांच्या आधारे अनन्या पांडेकडून जे चॅट मिळालेले आहेत त्या संदर्भात अनन्या पांडेने एनसीबीच्या चौकशीत सांगितले की, ती वीड पुरवण्याच्या व्यवसायात असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात नाही. तिचा एक मित्र आहे जो प्रसिद्ध, प्रभावशाली व्यक्ती आहे आणि तो मांगणी केल्यावर अरेंज करून देतो.

आर्यनच्या सांगण्यावरून अनन्यानी या प्रभावशाली मित्राला एक-दोनदा वीड देण्यास सांगितले होते. जे त्याने त्याच्या घरच्या स्टाफ मार्फत पाठवले होते आणि अनन्याने ही तिच्या कर्मचार्‍यांमार्फत ते प्राप्त केले होते. आणि नंतर जेव्हा ती आर्यन खानला भेटली तेव्हा तिने ते आर्यनला दिले, ज्याचा या चॅटमध्ये उल्लेख आहे.

एनसीबीने शुक्रवारी पहाटे संबंधित कर्मचार्‍यांला चौकशीसाठी आणलं होता, अनन्याच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये वीड पाठवणारा म्हणून ज्याचा उल्लेख करण्यात आला होता आणि त्यानंतर काल संध्याकाळी त्या हाऊस स्टाफला जाण्याची परवानगी देण्यात आली. पण NCBने त्याचा फोन जप्त केला आहे आणि सोमवारी त्यांना पुन्हा बोलावले आहे.

NCB च्या सूत्रांनुसार सदर हाऊस स्टाफ सोबत केलेल्या चौकशी आणि सीज करण्यात आलेल्या चॅटच्या माध्यमातून एका सुप्रसिद्ध सेलिब्रिटीच्या ड्रग्स कनेक्शन आणि आणि सप्लाय करणारी लिंक सापडली आहे.

एनसीबी अनन्या पांडेच्या दोन्ही मोबाईल फोनचा डेटा रिट्राईव्ह (पुनर्प्राप्त) करण्याच्या प्रयत्न करत आहे. जेणेकरून अनन्या पांडेने चौकशीत दिलेल्या माहितीच्या तथ्यांची पडताळणी करता येईल. याच कारणासाठी अनन्या पांडेला सोमवारी पुन्हा बोलावण्यात आले आहे. अनन्याच्या म्हणण्यानुसार, तिला वीडबद्दल जास्त माहिती नव्हती. साधारणपणे ती त्याला ‘जॉईंट’च्या नावाने ओळखत असे आणि तिला हे माहित नव्हते की हा जॉइंट वीड किंवा गांजा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.