पुणे – मोक्याच्या जागी निवासी व व्यावसायिक प्रकल्पांची निर्मिती तसेच जुन्या इमारतींचा पुनर्विकास या क्षेत्रात नावलौकिक असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन्सचा नवरात्रातील गृह महोत्सव यंदा ग्राहकांना अधिक लाभदायक ठरणार असल्याची माहिती गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी दिली.
गोखले म्हणाले गेली सलग आठ वर्षे आंम्ही सदर गृहमहोत्सवाचे आयोजन करीत आहोत. दरवर्षी ग्राहकांचा महोत्सवास उदंड प्रतिसाद लाभतो. सिटी प्राईड – कोथरूड समोर सकारात असलेल्या गोखले बिझनेस बे या भव्य व्यापारी संकुलात ऑफिस (व्यावसायिक वापराच्या जागा) केवळ रुपये 9999 प्रती चौरस फुट इतक्या किमतीत विकत घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सध्याच्या बाजार भावानुसार येथील व्यावसायिक जागा खरेदी करण्याचा दर हा अंदाजे रुपये 16,000 प्रती चौरस फुट आहे.
याबरोबरच पुणे शहरातील 9 मोक्याच्या ठिकाणी साकारणाऱ्या निवासी गृहप्रकल्पांमध्ये सदनिका खरेदी केल्यास त्यावर तेथे असलेल्या बाजार भावावर थेट रुपये 999 प्रती चौरस फूट सवलत मिळेल. ही सवलत विशेष योजनेअंतर्गत दुप्पट करून घेण्याची संधी ग्राहकांना असेल. प्रभात रस्ता, कोथरूड, पटवर्धन बाग, सुभाष नगर अशा भागांमध्ये साकारणाऱ्या गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या गृहप्रकल्पातील सदनिका बुकिंगसाठी उपलब्ध असतील.
गेल्या नवरात्र महोत्सवापासून आजवर विविध भागात साकारलेल्या गृहप्रकल्पातील सुमारे 500 सदनिकांचा ताबा गोखले कन्स्ट्रक्शन्स तर्फे ग्राहकांना देण्यात आला. पुढील एक वर्षात आणखी 750 सदनिकांचे ताबे ग्राहकांना देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आजवर गोखले कन्स्ट्रक्शन्सतर्फे सुमारे 45 लाख चौरस फुट इतके बांधकाम पूर्ण करण्यात आले असून त्यात 175 हून अधिक पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा समावेश आहे.