गोखले कन्स्ट्रक्शन्सचा ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात

कोथरूड, कर्वेनगर, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता भागात घरपोच किराणा, औषधे
पुणे – लॉकडाउनच्या परिस्थितीत गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या अंतर्गत शहराच्या प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, कर्वेनगर, पटवर्धन बाग, मयुर, आयडियल, डहाणूकर, रामबाग कॉलनी या भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष हेल्पलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे.

या हेल्पलाइनवर संपर्क केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक किराणामाल व अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सेवा ज्येष्ठ नागरिकांना मोफत व घरपोच मिळणार आहे. ही सेवा हवी असल्यास नागरिकांनी सकाळी 10 ते दुपारी 12 आणि सायं.4 ते सायं. 6 या वेळेत खाली नमूद संपर्क क्रमांकावर साधावा.

या परिस्थितीत आपण सर्वजण एकमेकांना खंबीर साथ देण्याची गरज असून त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न करीत असल्याचे या वेळी गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी कळविले आहे. गोखले कन्स्ट्रक्शन्स करत असलेले हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत पुणे महापालिकेने देखील यासाठी आवश्यक त्या परवानग्या देऊ केल्या आहेत.

येथे साधा संपर्क
जेष्ठ नागरिकांनी प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता – महेश : +91 95521 05109; कर्वेनगर, पटवर्धन बाग – अमोल : +91 73504 98999 ; मयुर, आयडियल, डहाणूकर, रामबाग कॉलनी- योगेश : +91 97620 77001 या क्रमांकावर संपर्क साधावा.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.