Navneet Rana | Lok Sabha Election 2024 : युवा स्वाभिमानचा राजीनामा देत खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे अर्ज दाखल करणे सुरू होणार, तत्पूर्वी त्यांनी दि. २७ मार्च रात्री नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला त्यांचे पती तसेच युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष व आमदार रवी राणा यांची उपस्थिती होती.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. या यादीत अमरावती मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. सध्या त्यांनी आपला प्रचार देखील सुरु केला आहे. मात्र, अश्यातच नवनीत राणा या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. । Navneet Rana | Chandrashekhar Bawankule
बावनकुळे यांच्या एका विधानामुळे नवनीत राणा नाराज असून त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे बोलूनही दाखवली आहे. ‘मी आणि माझे पती रवी राणा, यांच्यात मध्ये पडू नका, बोली नका’, असा सल्ला देत नवीनत राणांनी थेट भाजपा प्रदेशाध्यक्षांनाच सुनावलं आहे.
खरंतर नवनीत राणा यांच्या प्रवेशानंतर अमरावती येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रशेखर बावनुकळे यांनी एक वक्तव्य केलं. नवनीत राणा यांनी त्यांचे पती रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बावनुकळे म्हणाले. येत्या काही दिवसांतच नवनीत राणा या त्यांचे पती रवी यांना भाजपमध्ये येण्याचे आदेश देतील…’असे वक्तव्य बावनकुळे यांनी केलं.
मात्र, आता त्यांचं हे वक्तव्य नवनीत राणा यांना फारसं आवडलं नसून, त्यांनी थेट बावनकुळे यांचा समाचार घेतला आहे. “मी भारतीय जनता पक्षाची एक कार्यकर्ती आहे. माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत.
भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मी स्वत: माझ्या मर्जीने घेतला आहे. आमदार रवी राणा यांची स्वत:चा युवा स्वाभिमान पक्ष आहे. ते भाजपमध्ये येतील की नाही, हे आम्ही ठरवू. खरे तर नवरा-बायकोच्या मध्ये कुणी न बोललेले बरे, असा टोला नवनीत राणा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. । Navneet Rana | Chandrashekhar Bawankule
‘राजकारण सोडेन पण नवनीत राणाचा प्रचार करणार नाही’ – आनंदराव अडसूळ
“खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वाट्टेल ते बोलण्याची सवय आहे. जे होणार आहे, तेच आम्ही बोलतो. अमरावती लोकसभा मतदार संघातून कुठल्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असून एकवेळ राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी दिलीय.