नवीन पटनाईक यांनी सलग पाचव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली- ओडिशाचे मुख्यमंत्रिपद गेली 19 वर्षे भूषविणारे ‘नवीन पटनायक’ सलग पाचव्यांदा मुखमंत्री पदाचे दावेदार ठरले असून आज आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. देशात सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा असताना सुद्धा ओडिशात नवीन पटनाईक यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. नवीन पटनाईक हे ओडिशामध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. नवीन पटनायक यांच्या कैबिनेट एकूण 11 कैबिनेट मंत्री, 9 राज्य मंत्री यांच्या समावेश आहे.

मोदींच्या लाटेतही ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्यातील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीचा अधिकृत निवडणुक निकालमध्ये बीजेडीने 112 जागेवर विजय मिळून पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखून दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.