महाराष्ट्राच्या किनारपट्टीला नुकतेच निसर्ग चक्रीवादळ धडकले होते. यात रायगडसह किनारपट्टी भागात अतोनात नुकसान झाले आहे. याचा फटका पनवेल येथे असलेल्या सलमान खान याच्या फार्म हाउसलाही बसल्याचे समजते. भाईजानची गर्लफ्रेंड युलिया वान्तूरने नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात वादळाने पडलेल्या झाडांचे फोटो शेअर केले आहेत. त्यात वादळापूर्वीचे फार्म हाउस आणि वादळानंतरचे फार्म हाउस दाखविण्यात आले आहे.
सलमान लॉकडाऊन लागल्यापासून याच फार्म हाउसवर आहे आणि त्याची मैत्रीण युलिया तसेच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस सुद्धा येथेच होते. सलमान त्याच्या कुटुंबापासून दूर असला तरी तो त्याचे अपडेट सोशल मीडियावर सातत्याने देत आहे. या काळात त्याने तीन व्हिडिओ रिलीज केले असून करोना ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान, सलमानने नुकतेच पर्सनल केअर ब्रांड एफआरएसएच लॉंच केला आहे. त्याने त्याअंतर्गत 1 लाख हॅंड सॅनीटायझर मुंबई पोलिसांना मोफ वाटले आहेत. सलमानचा आगामी “राधे’ चित्रपट पूर्ण झाला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलली गेली आहे.