रॉटरडॅम – युरोपियन फुटबॉल क्षेत्रातील मानाची समजली जात असलेली नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धा स्पेनने जिंकली. त्यांनी विजेतेपदाच्या लढतीत क्रोएशियावर पेनल्टी शुटआऊटमध्ये 5-4 अशी मात करत करंडक उंचावला. स्पेनने तब्बल 11 वर्षांनी या स्तरावरच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.
निर्धारित वेळेत तसेच अतिरिक्त वेळेतही सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर शूटआऊट घेण्यात आला. त्यात स्पेनचा गोलरक्षक उनाइ सिमॉनने क्रोएशियाच्या दोन पेनल्टी रोखत संघाचा विजय निश्चित केला. पेनल्टी शूटआऊटमध्येही ही लढत 3-3 अशा बरोबरीत आली होती. तेव्हा सिमॉनने लोवरो मायेरची पेनल्टी रोखली.
यानंतर मार्कस असेनिओने गोल करत स्पेनला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. क्रोएशियाच्या इवान पेरिसिचने गोल करत सामना पुन्हा 4-4 असा बरोबरीत आणला. यानंतर सायमनने ब्रूनो पेटकोव्हिचची पेनल्टी रोखत क्रोएशियावर दडपण वाढवले.
यानंतर डॅनी कार्वाहालने पेनल्टीवर गोल करत स्पेनचा विजय साकार केला. स्पेनने यापूर्वी 2010 साली विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. तर, 1964, 2008 तसेच 2012 साली त्यांनी युरोपियन स्पधेचे अजिंक्यपद पटकावले आहे.