-->

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : सुरज, पृथ्वीराजला रजत

नरसिंगची सुमार कामगिरी

पुणे – महाराष्ट्राच्या सुरज कोकाटे व पृथ्वीराज पाटिल यांनी 65 व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ( National Wrestling Championship )रजतपदक मिळविले. मात्र, चार वर्षाच्या बंदीनंतर राज्यासाठी नरसिंगचे राष्ट्रीय पुनरागमन अपयशी ठरले.

उत्तर प्रदेशात नोएडा येथे ही स्पर्धा सुरू असून, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 57, 61, 74, 92 व 125 किलो वजन गटाच्या लढती पार पडल्या. करोनाच्या संकटकाळानंतर देशात पहिली राष्ट्रीय स्पर्धा पार पाडण्याचा मान कुस्तीने मिळविला. सर्व मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करून या लढती पार पडल्या.

पहिल्याच दिवशी फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या सुरज कोकाटे (61 किलो) व पृथ्वीराज पाटिल (92 किलो) यांना रजतपदकावर समाधान मानावे लागले. सफाईदार विजय मिळिवणाऱ्या या दोन्ही मल्लांनी अंतिम फेरीत मात्र प्रतिस्पर्ध्याचे आव्हान पेलवले नाही.

सुरजवर वेगवान खेळणाऱ्या सेनादलाच्या रविंदरने तांत्रिक विजय मिळविला. पृथ्वीराज रेल्वेच्या सुमितविरुद्ध निष्प्रभ ठरला. पहिल्याच फेरीला सुमितने त्याला चितपट केले.

नरसिंगची सुमार कामगिरी

उत्तेजक सेवन प्रकरणातील बंदी संपल्यानंतर प्रथमच राष्ट्रीय पातळीवर उतरलेल्या नरसिंगच्या कामगिरीबाबत कमालीची उत्सुकता होता. मात्र, त्याचे पुनरागमन अपयशी ठरले. स्पर्धेती 74 वजनी गटातील लढतीत त्याला हरियानाच्या अमित धनकरकडून 4-3 असा पराभव पत्करावा लागला. ही लढत चुरशीने चालली होती. मात्र, अखेरच्या 10 सेकंदाला अमितने एक चाक डावावर नरसिंगवर ताबा मिळविला व महत्वपूर्ण गुण वसूल करत विजय मिळविला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.