पाचगणी (सादिक सय्यद ,प्रतिनिधी) : – स्वच्छतेचे शहर म्हणून नावलौकीक असलेल्या पाचगणी शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सर्वोच्च पर्यटन सुविधा देणारे शहर म्हणून पाचगणीची नॅशनल टुरिझम अँवार्डकरीता पाचगणी शहराची निवड झाली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली.
जगात दुसऱ्या क्रमांकाचे पठार तसेच स्वच्छतेच शहर म्हणून नावलैाकीक असलेल शहर म्हणुन ओळख असलेल्या पाचगणी शहरात येणा-या पर्यटकांना मूलभुत सुविधा देताना उत्कृष्ट नियोजन असल्याने केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून याबाबत प्रस्तावाची मागणी करण्यात आली होती.
पर्यटकांना मुलभुत सुविधा देणारा सर्व बाबीच परिपूर्ण अहवाल पाचगणी नगरपालिकेकडून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाला सादर करण्यात आला होता. यावरुन केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या टीमने पाचगणी शहरात येऊन सर्व्हे श केला . पाचगणी शहराला देण्यात येणारा नॅशनल टुरिझम अॅवार्ड दिल्ली येथे २७ सप्टेबरला देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सांगितले .
पाचगणी शहराला मिळालेला पुरस्कारात माजी नगरसेवकांचा सिहांचा वाटा असून हा पुरस्कार पाचगणी शहराच्या सर्वसामान्य जनतेचे यश असल्याची प्रतिक्रिया दापकेकर यांनी दिली.