पुणे – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देशातील 44 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कडदोरा येथील उमेश रघुनाथ खासे व गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील खुर्शीद कुतबुद्दीन शेख यांचाही समावेश आहे.
येत्या 5 सप्टेंबरला शिक्षकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचे वितरण होणार आहे.
ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी ज्या तांड्यावर साधी मोबाइलला रेंज नव्हती अशा ठिकाणी मुलांना ऑफलाइन शिकता यावे यासाठी 51 ऑफलाइन ऍपची निर्मिती केली. व्हिडिओ निर्मिती करून स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याचे डिजिटल साहित्य निर्माण केले, अशी माहिती उमेश खोसे यांनी दिली आहे.