पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता आठवीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. यात पात्र 11 हजार 682 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातील 797 विद्यार्थ्यांचा निवड यादीत समावेश आहे.
राज्यात 6 एप्रिल रोजी “एनएमएमएस’ परीक्षा घेण्यात आली. 26 जुलै रोजी निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थी, पालकांना जात, अपंगत्व, जन्म दिनांक याबाबत दुरुस्त्याही मागवल्या होत्या. त्याचा विचार करून पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर झाली.
“एनएमएमएस’ परीक्षेसाठी 97 हजार 685 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र राज्यासाठी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा कोटा निश्चित करून देण्यात आला होता. परीक्षा निकाल व निवड यादी परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी दिली.