नवी दिल्ली – दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे संसदेनेही मान्य केले आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी एका बातमीचा हवाला देऊन म्हटले आहे. याबद्दल त्यांनी हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी दिल्लीकरांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांना श्रेय दिले आहे.
ट्विटरवर केजरीवाल यांनी एका बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केला, ज्यामध्ये म्हटले आहे की, आर्थिक सर्वेक्षण 2022-23 च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारली आहे.
चांगली, समाधानकारक आणि मध्यम हवेच्या गुणवत्तेच्या दिवसांची संख्या 2016 मध्ये 108 इतकी होती. ती आता 197 पर्यंत वाढली आहे. देशाच्या संसदेनेही दिल्लीतील हवेचा दर्जा सुधारत असल्याचे मान्य केले आहे.
Adani scam : अदानी घोटाळा प्रकरणामुळे देशाच्या प्रतिष्ठेला बाधा – मायावती
दिल्लीकरांच्या सततच्या प्रयत्नांचे हे फळ आहे. प्रत्येक कठीण काम जेव्हा तुम्ही करण्याचा निर्धार कराल तेव्हाच ते शक्य आहे. आपल्याला हवेची गुणवत्ता आणखी सुधारायची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.