कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यानंतर नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते पवन बन्सल यांची अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) टीम चौकशी करत आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पवन बन्सल यांना ईडी कार्यालयात हजर करण्यात आले. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. यापूर्वी सोमवारी ईडीने काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचीही चौकशी केली होती.
Delhi | Congress leader and former Union Minister Pawan Bansal appears at ED office for questioning in connection with National Herald corruption case pic.twitter.com/wbMCD95yFP
— ANI (@ANI) April 12, 2022
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणातील केंद्रीय एजन्सीचा तपास वेगाने वाढत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन कुमार बन्सल हे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि काँग्रेस पक्षाचे अंतरिम कोषाध्यक्ष आहेत. दरम्यान यंग इंडियन लिमिटेडच्या इतर प्रवर्तकांनवर सुद्धा ईडी लवकरच कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे.