धवनच्या पोस्टमुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अधिकारी अडचणीत

नवी दिल्ली- भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याने 17 जूलैला एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता. या फोटोत पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि उमेश यादव एकत्र दिसले होते. मात्र केवळ एकच दिवसापुर्वी बीसीसीआयने शॉला निलंबित केले होते. त्यामुळे त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करण्याचे परवानगी आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला असून त्यामुळे अकादमीचे अधिकारी अडचणीत आले आहेत.

बीसीसीआयने शॉ ला 16 जूलैलाच डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याच्या प्रकरणात निलंबित केले होते. मग 17 जूलैला पृथ्वी शॉ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव कसा करत होता? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या प्रश्नावर घोष यांनी मौन बाळगले आहे.

याविषयी वृत्तसंस्थेशी बोलताना घोष म्हणाले की, या मुद्‌द्‌यावर मी काहीही बोलू शकत नाही. याच योग्य उत्तर तुम्हाला बीसीसीआय देऊ शकेल. बीसीसीआयचे कार्यकारी अधिकारी राहुल जौहरी यांनी पृथ्वीच्या निलंबनासंदर्भातील माहिती दिली होती का? या प्रश्नावर त्यांनी काहिही उत्तर दिले नाही. धवनच्या पोस्टमुळे निलंबनानंतर पृथ्वी राष्ट्रीय अकादमीमध्ये कसा या प्रश्नासह राष्ट्रीय अकादमीचा भोंगळ कारभार सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.