मुंबई – अभिनेत्री ‘नताशा स्टेनकोविक’ आणि भारतीय क्रिकेटपटू ‘हार्दिक पांड्या’ हे लोकप्रिय कपल नेहमीच चर्चेत असतात. हे दोन्ही लव्ह बर्डस नेहमीच सोशलवर रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात. हे दोघेही रोज आपले व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करतात. फॅन्स देखील त्यांच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
नुकतंच, नताशाने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला असून, यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या या बोल्ड लूकवर पती हार्दिक पांड्या देखील फिदा झाला आहे.
नताशा स्टँकोविकने हा व्हिडिओ स्विमिंग पूलमधला आहे. यावेळी तिने लाल रंगाचा स्वीमसूट परिधान केला असून, ती स्विमिंग पूलमध्ये हॉट लूक देत आहे. तिचा हा अंदाज पाण्यात सुद्धा आग लावणारा आहे.
View this post on Instagram
दरम्यान, नताशाचा हा व्हिडिओ पाहून हार्दिक पंड्याही स्वत:ला रोखू शकला नाही. कमेंटमध्ये त्याने हार्ट आणि फायरचा इमोजी टाकला आहे. नताशा स्टँकोविकच्या या व्हिडिओवर बऱ्याच कमेंटस आल्या आहेत. हार्दिक आणि नताशा यांना एक मुलगाही आहे.