Chhagan Bhujbal| नाशिक लोकसभा मतदार संघातील जागाचा महायुतीचा पेच अद्याप सुटलेला नाही. नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यातच ते भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर भूजबळ यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ? Chhagan Bhujbal|
“मी कमळाच्या चिन्हावर लढणार यात काहीही तथ्य नाही. ही सगळी बातमी खोटी आहे. या अफवा आहेत. त्याला कशाचाही आधार नाही. ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून असेल. अजितदादांनी नाशिकची जागा मागून घेतली आहे,” असे भुजबळ म्हणालेत.
“तसेच वरून ही जागा तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या, पण तिथे छगन भुजबळ यांनाच उभे करा, असे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याला सांगितले आहे. यापेक्षा अधिक मी काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे मी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार नाही. याबाबतच्या चर्चा केवळ अफवा आहेत. माझ्याकडे कुणीही चिन्हाबाबत मागणी केली नाही, “असे त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा फुले यांचा नाशिकमध्ये पूर्णाकृती पुतळा नाही. तो पुतळा बसवण्याचं काम नाशिकमध्ये सुरु आहे. यानिमित्त भुजबळ यांनी आज महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त शहरातील विविध भागांना भेटी दिल्या. यावेळी प्रसार माध्यामांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा:
‘एकनाथ खडसेंना राज्यपाल करु नये…’; अंजली दमानिया आक्रमक, थेट राष्ट्रपतींनाच लिहले पत्र