Purple Cap IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. आज म्हणजेच रविवारी बारावा आणि तेरावा सामना खेळाला होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी पंजाब किंग्जचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी झाला. ज्यामध्ये पंजाब किंग्जचा 21 धावांनी पराभव झाला.
यासह लखनौ संघाने विजयाचे खाते उघडले. पंजाबचा पराभव केल्यानंतर लखनौचा संघ शेवटच्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला. या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत कोणताही बदल झाला नाही. सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानकडून अद्याप कोणीही पर्पल कॅप हिसकावून घेऊ शकलेले नाही. | Purple Cap IPL 2024
पर्पल कॅप IPL 2024
मुस्तफिझूर रहमानच्या डोक्यावर पर्पल रंगाची टोपी अद्याप कायम आहे.आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंना पर्पल कॅपची पदवी दिली जाते. आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत 11 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये CSK वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानचे नाव पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे, ज्याने आतापर्यंत दोन सामन्यांत 6 बळी घेतले आहेत. | Purple Cap IPL 2024
या मोसमात आतापर्यंत कोणताही गोलंदाज त्याच्यापेक्षा जास्त विकेट घेऊ शकलेला नाही. पर्पल कॅप शर्यतीत टॉप-5 मध्ये एकमेव भारतीय KKR चा हर्षित राणा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2 सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. तर कागिसो रबाडा, सॅम कुरान आणि आंद्रे रसेल हे टॉप-5 मध्ये आहेत. | Purple Cap IPL 2024
IPL 2024 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज ( IPL 2024 Purple Cap Holder )
1. मुस्तफिझूर रहमान (CSK) – 2 सामन्यात 6 विकेट
2. हर्षित राणा (KKR) – 2 सामन्यात 5 विकेट्स
3. कागिसो रबाडा (पीबीकेएस) – 3 सामन्यात 4 विकेट
4. सॅम कुरन (पीबीकेएस) – 3 सामन्यात 4 विकेट
5. आंद्रे रसेल (KKR) – 2 सामन्यात 4 विकेट
GT vs SRH : खराब ओपनिंगचा फटका.. सनरायझर्सने गुजरातसमोर विजयासाठी ठेवलं इतक्या रन्सचं आव्हान