Narendra Modi on Amol milk । पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. येथे अमूल फेडरेशनच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमोल ब्रँडचे कौतुक केले. देशात अमूलसारखा दुसरा ब्रँड नाही. अमूल शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. अमूल फेडरेशनच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सांगितले की, ‘भारतातील ८ कोटींहून अधिक लोक थेट डेअरी क्षेत्राशी संबंधित आहे.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असेही सांगितले की, ’10 वर्षांत दुधाची उपलब्धता 40 टक्क्यांनी वाढली आहे. 10 लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या क्षेत्रात महिला शक्ती आहे आणि महिला शक्तीमुळे भारताचे दुग्ध क्षेत्र वाढले आहे.’
महिलांची आर्थिक ताकद वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे
देशातील महिलांची आर्थिक शक्ती वाढवणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले,’महिलांची आर्थिक शक्ती वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे. गेल्या 10 वर्षात 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत देण्यात आली आहे. 4 कोटी घरांपैकी सर्वाधिक घरे महिलांच्या नावावर आहेत. समाजातील महिलांचा आर्थिक सहभाग वाढला आहे.’

महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण
आता देशातील महिलांनाही ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. महिलांना 15 हजार आधुनिक ड्रोन दिले जात आहेत. दुग्धव्यवसाय 6 टक्के दराने वाढत आहे. भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे महत्त्वाचे आहे.डेअरी उद्योगात 11 लाख महिला
पीएम मोदी पुढे म्हणाले की, गेल्या 20 वर्षांत राज्यातील दूध महामंडळांची संख्या 12 वरून 23 वर दुप्पट झाली आहे. 11 लाख महिलांसह 36 लाखांहून अधिक लोक डेअरी उद्योगाशी संबंधित आहेत. 16,384 दूध गृहांपैकी 3300 संपूर्णपणे महिला चालवतात. या महिला त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार बनल्या आहेत. देशाला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात डेअरी उद्योगाचे मोठे योगदान आहे.