मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकतीच 12 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील पिथौरागढला भेट दिली. दौऱ्याच्या सुरुवातीला ते पार्वती कुंडात (Kailash Parvat) पोहोचले होते आणि येथून निघाल्यानंतर त्यांनी जागेश्वर धामला भेट दिली. त्यानंतर मोदींनी दोन्ही ठिकाणांची फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहलं की,
“जर मला कोणी विचारले, तुम्ही उत्तराखंडमधील एक जागा पाहिली तर ती कोणती जागा असेल? तर मी सांगेल.. की तुम्ही पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिराला भेट दिलीच पाहिजे. नैसर्गिक सौंदर्य आणि देवत्व तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. अर्थात, उत्तराखंडमध्ये पाहण्यासारखी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत आणि मी अनेकदा या राज्याला भेट दिली आहे.
यामध्ये केदारनाथ आणि बद्रीनाथ या पवित्र स्थळांचा समावेश आहे, जे सर्वात संस्मरणीय अनुभव आहेत. पण, अनेक वर्षांनी पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिरात परतणे विशेष होते’. असं देखील पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहेत.
दरम्यान, त्यानंतर पंतप्रधान मोदींचे हे फोटो मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. अमिताभ यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “धार्मिकता…रहस्य.’ कैलास पर्वताच्या देवत्वाने नेहमीच आकर्षित केले आहे, परंतु समस्या अशी आहे की मी या ठिकाणांना कधीही भेट देऊ शकणार नाही.” असं म्हंटलं आहे.
T 4799 – The religiosity .. the mystery .. the divinity of Kailash Parbat , has been intriguing me for long .. and the tragedy is that I shall never be able to visit it in person .. pic.twitter.com/x5xe7ZAXaB
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 14, 2023
तर रविवारी पंतप्रधान मोदींनी अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटला उत्तर दिले. यासोबतच पंतप्रधान मोदींनी अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर कच्छला भेट देण्याचे निमंत्रण देखील दिले आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिले की, “पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिरांचे दर्शन थक्क करणारे होते. काही आठवड्यात रण उत्सव सुरू होत आहे.
My visit to Parvati Kund and Jageshwar Temples was truly mesmerising.
In the coming weeks, Rann Utsav is starting and I would urge you to visit Kutch. Your visit to Statue of Unity is also due. https://t.co/VRyRRy3YZ8
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2023
तुम्ही कच्छला यावे अशी माझी इच्छा आहे. तुमची स्टॅच्यू ऑफ युनिटीची भेट अजून बाकी आहे.’ असं मोदी म्हणाले. मात्र, आता पंतप्रधान मोदींनी केलेल्या या ट्विटच्या चर्चेला उधाण आले असून, मेगास्टार अमिताभ बच्चन मोदींच्या ट्विटला काय? उत्तर देणार हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, पार्वती सरोवर हे एक पवित्र सरोवर आहे, जे आदि कैलासच्या शिखराजवळ 4,497 मीटर उंचीवर आहे. तलावाच्या काठावर भगवान शिव आणि पार्वतीचे मंदिर आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी या मंदिराला भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदी उत्तराखंडी पोशाखात दिसले. त्यांनी डोक्यावर फेटा बांधला होता.