बलात्कार प्रकरणी नारायण साई दोषी; शिक्षेबाबत ३० एप्रिल’ला निर्णय

नवी दिल्ली: आसाराम बापू यांचे पुत्र नारायण साई वर बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आहे. सुरत सेशन कोर्टाने त्यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले असून नारायण साईच्या शिक्षेबाबत न्यायालय ३० एप्रिल रोजी निर्णय देणार आहे. गुजरातमधील आश्रमात महिला साधकावर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आसाराम शिक्षा भोगत आहेत. सुरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी नारायण साई व आसाराम यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप लावला होता. पोलिसांनी पीडित बहिणींचे जबाब आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. नारायण साईविरोधात कोर्टानं आतापर्यंत ५३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.