वाघोली – हवेली तालुक्यात भाजपा विद्यार्थी आघाडी हवेली च्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त व पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त नमो प्रश्नोत्तरी हा कार्यक्रम संत तुकाराम स्पर्धा परिक्षा अभ्यासीका पेरणे येथे पार पडला.
या प्रसंगी पुणे जिल्हा युवा मोर्चा चे प्रभारी व जिल्हा उपाध्यक्ष प्रविणनाना काळभोर व पुणे जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अमोल शिवले, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिपआबा सातव, पंचायत समिती सदस्य शामभाऊ गावडे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, माजी उपसरपंच रविंद्र वाळके, माजी सरपंच विक्रम गायकवाड,
कदमवाकवस्ती शहराध्यक्ष विशाल गुजर, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष व प्रभारी रोहन पाचंगे, कामगार आघाडी उपाध्यक्ष संजू शिवले, युवा मोर्चा हवेली संघटन सरचिटणीस गौरव झुरुंगे, हवेली चे अध्यक्ष ओंकार कंद व सरचिटणीस सिद्धांत लोखंडे, समिर झुरुंगे, पृथ्वी कंद, शुभम शहा व इतर मान्यवर उपस्थित होते.