मुंबई – मुंबई आणि खड्डे हे समीकरण प्रत्येक पावसाळ्यात मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर पाहायला मिळत. त्यात खड्ड्यांचं खापर दरवर्षी मुंबई महानगर पालिकेवर फोडलं जातं, तसेच सत्तेत असलेल्या शिवसेनेवर थेट टीका होते.
हे चित्र यंदाही पाहायला मिळतं आहे. सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरुन अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आणि खड्डे का पडले याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला. महापौरांचा हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेरात कैद झाला आणि हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला.
काय काय करतात आपल्यासाठी हे. आणि आपण फक्त खड्ड्यांविषयी तक्रारी करतो. #Sarcasm https://t.co/7dy9hy5jJq
— Kedar Shinde (@mekedarshinde) September 28, 2021
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे यांनी देखील हा व्हिडीओ शेअर करत एक खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
‘काय काय करतात आपल्यासाठी हे. आणि आपण फक्त खड्ड्यांविषयी तक्रारी करतो…’, असे लिहित त्यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.