पुणे -लष्कराच्या “आयएनएस शिवाजी’ या संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराला “छत्रपती शिवाजी महाराज’ आणि “कान्होजी आंग्रे’ यांची नावे देण्यात आली आहेत. यासह भारत छोडो आंदोलनाच्या 79 व्या वर्षानिमित्त लोणावळा स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
लष्कराच्या वतीने देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने “आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यांतर्गत क्रांतिदिनाच्या दिवशी “आयएनएस शिवाजी’च्या प्रवेशद्वाराचे नामांतरण करण्यात आले.
यावेळी “आयएनएस शिवाजी’चे कमांडर अरविंद रावल उपस्थित होते. संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थींना आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने प्रेरणा मिळण्याच्या अनुषंगाने लष्कराच्या वतीने “आझादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उपक्रम 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.