रंगाच्या हव्यासापेक्षा हळदीचे सौभाग्यलेणेच उत्तम
नगर – नवरात्रीनिमित्त बाजारपेठेत देवीच्या पूजा साहित्य खरेदीत हळद आणि कुंकू हे अत्यावश्यक मानले जाते. कुंकू हे सौभाग्याचं लेणं. पूजा विधीतील एक मंगल वस्तू. पण या कुंकवातही मोठ्या प्रमाणावर भेसळ होत आहे. पावित्र्याचे आणि मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या कुंकवात रसायनांचा वापर होत आहे. असे रासायनिक कुंकू लावल्याने त्वचेवरती विविध दुष्परिणाम होतात.
सध्याला नवरात्रीच्या काळ सुरू असल्याने कुंकवाला बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. या कुंकवाचे दर 50 रुपये ते 400 रुपये किलो असे असून जे स्वस्त आपली कुंकू आहे ते रासायनिकच असते. ते कपाळावर लावल्याने खाज येणे, पुरळ येणे असे त्वचा विचार उद्भवू शकतात. त्यामुळे जनसामान्यांनी बाजारपेठेमध्ये कुंकू खरेदी करताना शक्यतो रासायनिक नसलेले व उच्च प्रतीचे कुंकू खरेदी केले तर उत्तम.
साधा कुंकवाचा डाग शक्यतो लवकर निघत नाही. तर रासायनिक नसलेले कुंकू सहजपणे पुसता येते ही याची मुख्य ओळख म्हणता येईल. त्यामुळे नवरात्रीनिमित्त बाजार पेठेत देवीच्या पूजा साहित्य खरेदीत कुंकू रसायन नसलेले उच्च प्रतीचे कुंकू खरेदी करावे. त्यामुळे कुठलीही त्वाचा विकार होणार नाही.
बाजारामध्ये अनेक प्रकारचे कुंकू आहे, परंतु त्यामधील चांगल्या प्रकारच्या कुंकवाला मागणी असते. डीलक्स व पिंजर यांचा यामध्ये समावेश होतो. किरकोळ विक्रीसाठी येणाऱ्या कुंकवात काही प्रमाणात रसायनांचा वापर असतो. अशा कुंकवाच्या वापराने कपाळाला खाज येऊन फोडही येतात.
संतोष गांधी एन. आर. सुगंधी दुकानाचे मालक