कोपरगाव : राहुरी येथील न्यायालयात वकिली करणाऱ्या पती-पत्नीची झालेल्या हत्येचा कोपरगाव वकील संघाच्यावतीने न्यायालयीन कामकाज बंद ठेवत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव या दाम्पत्याची अतिशय क्रुरपणे हत्याा करण्यात आली. या घटनेने वकीलामध्ये भितीचे वातवरण निमार्ण झाले आहे. त्यामुळे वकिलांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजातील वाईट अपप्रवृत्तीपासून वकिलांना कायद्याने सरंक्षण मिळणे गरजेचे आहे. त्याकरीता राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल मंजूर करून वकिलांना संरक्षण द्यावे, असे निवेदन महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन यांना पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, घटनेचा निषेध म्हणून कोपरगावचे तहसिलदार भोसले, कोपरगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन अॅड. आढाव दाम्पत्यास श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एम. पी. येवले, ॲड. ए. डी. टुपके, ॲड. शरद गुजर, अशोक वहाडणे, ॲड. भास्कर गंगावणे, ॲड. शंतनू धोर्डे, ॲड. जयंत जोशी, ॲड. विजय गवंदे, ॲड. के.बी. शिंदे, ॲड. विद्यासागर शिंदे, ॲड.साहेबराव खालकर, ॲड. एस.एम.वाघ, ॲड. गुजराथी, ॲड. योगेश खालकर, ॲड.अतिश अगवान,
ॲड. मनोज कडू, ॲड. संजय मंडलिक, ॲड.अमोल टेके, ॲड. निलेश पवार, ॲड. दत्ता बनकर, ॲड. महेश भिडे, ॲड. एस.एम. मोकळ, ॲड. प्रकाश बोलागामावर, ॲड.योगेश जाधव, ॲड. व्ही. टी. सुपेकर, ॲड. ज्योती भुसे, ॲड. एस. डी. गव्हाणे, ॲड. विकास सदाफळ, ॲड. दीपक पोळ, ॲड. एम. यू. सय्यद, ॲड. श. तल देशमुख, ॲड. रफिक शेख, ॲड. अर्शद शेख, ॲड. गणेश मोकळ, ॲड. दीपक जाधव, ॲड. केतन शिरोडे, ॲड. संदीप सांगळे, ॲड. गणेश भोकरे, ॲड प्रशांत मोकळ, ॲड. निलेश कातकडे, ॲड. जी. जी. गुरसल, ॲड. लोणारी, ॲड. सतीश बोरुडे आदी उपस्थित होते.