पाथर्डी – आमदार मोनिका राजळे यांनी रविवारी परळी येथील गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतले. सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने जयंतीच्या पूर्वसंध्येला आमदार राजळे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत गोपीनाथ गड येथे जाऊन स्व. मुंडे यांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, संजय बडे, बजरंग घोडके, धनंजय बडे, महेश बोरुडे, रमेश हंडाळ आदी उपस्थित होते.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण आयुष्य राजकारणातून समाजकार्यासाठी दिले. सर्वांसाठी हवाहवसं नेतृत्व होते. त्यांनी कधी कोणाचा भ्रमनिरास केला नाही. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम स्व.मुंडे यांच्याकडून नेहमी झाले.
संपूर्ण देशाला व राज्याला त्यांचे आदर्शवत असे काम परिचित होते, असे गौरवोद्गार आमदार राजळे यांनी काढले. याप्रसंगी माजी मंत्री लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी आमदार मोनिका राजळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली. पंकजाताईंची होणारी भेट नेहमीच उत्साह व ऊर्जा देणारी असते, असेही आमदार राजळे म्हणाल्या.