शेवगाव – लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथे बाबा ग्रुपच्या वतीने मंगळवारी (दि.१२ )रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . त्यात १८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
सकाळी ९वाजता वडुले खुर्दमधील विठ्ठल -रुक्मिणी मंदिरासमोर स्व. मुंडे यांच्या प्रतिमेला सरपंच भाऊसाहेब आव्हाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बाबा ग्रुपचे अध्यक्ष विष्णुदास आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य तसेच युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. वडुले खुर्दमध्ये स्व. मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनाही आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी रक्तदाते संदिप आव्हाड, विष्णू आव्हाड, किशोर सोनवणे, मारुती आव्हाड, रामनाथ खेडकर, विशाल कलपूड, शुभम आव्हाड, शरद आंधळे, देविदास गीते, प्रसाद शिरसाट, संकेत आव्हाड, प्रमोद पठाडे, संतोष मिसाळ, ऋषिकेश आंधळे, रोहित गीते, महेश पालवे, रोहिदास गीते, सुनील रणमले यांनी रक्तदान केले.