नगरला ‘स्वच्छ भारत’ अभियानात ओ.डी.एफ.प्लस प्लस मानंकन

नगर- नगर महानगर पालिकेने स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला असून, या सर्वेक्षणात 2021 चे ओ. डी. एफ. प्लस प्लस मानंकन मिळाले आहे. महानगरपालिका स्वच्छ संरक्षण कक्षप्रमुख पी. एस. बिडकर यांनी ही माहिती दिली.

नगर महापालिकेस मिळालेल्या या मानांकन आता फाईव्हस्टार मानांकन मिळविण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी माहिती कक्षप्रमुखांनी दिली. यापूर्वी सन 2020 सालातही नगर महापालिकेला ओ. डी. एफ. प्लस प्लस मानांकन मिळाले होते.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत तपासणीसाठी आलेल्या विशेष पथकाने नगर शहरातील 32 सार्वजनिक शौचालयाचे सर्वेक्षण केले होते. त्यामधील 5 सार्वजनिक शौचालयांना सर्वोत्कृष्ट शौचालय म्हणून घोषित करण्यात आले होते. सन 2020-21 यावर्षी स्वच्छ भारत अभियानात फाईव्ह स्टार मानंकनासाठी सहभाग घेतला आहे.

तपासणी पथकाने नगरमधील 32 सार्वजनिक शौचालयांची तपासणी केली. त्यामध्ये सर्वच 32 सार्वजनिक शौचालये उत्कृष्ट दर्जाची असल्याची नोंद सर्वेक्षण अहवालात करण्यात आली आहे. त्याची आता फाईव्हस्टार मानांकनासाठी देखील मदत होणार आहे. महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे यांच्यासह उपायुक्त, घनकचरा विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे योगदान असल्याची माहिती बिडकर यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.