शिवसेनेच्यावतीने नगरमध्ये शिवजयंती उत्साहात

करोना निर्बंधांचे पालन करत पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी

नग- करोना प्रतिबंधक निर्बंधांचे पालन करत शिवसेनेच्यावतीने आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वच सामाजाला एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले. आजच्या युवा पिढीला महाराजांच्या कार्याची ओळख व्हायला हवी. त्यासाठी विविध मंडळानी व युवकांनी पुढे येऊन छत्रपतींचा इतिहास समजासमोर मांडावा, असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.

शिवजयंतीनिमित्त शहर शिवसेनेच्यावतीने आज माळीवाडा बसस्थानक चौकातील अश्‍वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी महापौर सुरेखा कदम, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेता संजय शेंडगे यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शिवजयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कायनेटीक चौक येथे शिवजयंतीनिमित्त युवराज दीपक खैरे प्रतिष्ठाच्यावतीने सावली प्रतिष्ठानला धान्य वाटप करण्यात आले. चितळे रोड, कायनेटीक चौक, बागरोजा हडको व शहरातील विविध चौकांत व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.