नगर (प्रतिनिधी) – नगर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उतरतीकडे असलेल्या करोना विषाणूने नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. काल सापडलेल्या संख्येपेक्षा जवळपास पाचशे रुग्ण जास्त आढळून आले आहेत. बाजारपेठ बंद असली तरी अत्यावश्यक सेवेसाठी खुल्या करण्यात आलेल्या वेळेतील गर्दी त्यास कारणीभूत ठरत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात आज 3 हजार 117 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 43 हजार 528 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 85.36 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्णसंख्येत पुन्हा 3 हजार 122 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 22 हजार 705 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 1 हजार 67, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 178 आणि अँटीजेन चाचणीत 877 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 101, अकोले 31, जामखेड 82, कर्जत 106, कोपरगाव 45, नगर ग्रामीण 50, नेवासा 18, पारनेर 111, पाथर्डी 118, राहता 31, राहुरी 64, संगमनेर 93, शेवगाव 152, श्रीगोंदा 30, श्रीरामपूर 06, कँटोन्मेंट बोर्ड 12, मिलिटरी हॉस्पिटल 12 आणि इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 397, अकोले 10, जामखेड 02, कर्जत 22, कोपरगाव 55, नगर ग्रामीण 132, नेवासा 25, पारनेर 34, पाथर्डी 46, राहाता 149, राहुरी 35, संगमनेर 104, शेवगाव 26, श्रीगोंदा 23, श्रीरामपूर 81, कँटोन्मेंट बोर्ड 25 आणि इतर जिल्हा 12 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 877 जण बाधित आढळुन आले. मनपा 85, अकोले 05, जामखेड 25, कर्जत 02, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 63, नेवासा 52, पारनेर 155, पाथर्डी 10, राहाता 124, राहुरी 79, संगमनेर 43, शेवगाव 25 श्रीगोंदा 135, श्रीरामपूर 31, कँटोन्मेंट 17 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 898, अकोले 133, जामखेड 109, कर्जत 169, कोपरगाव 76, नगर ग्रामीण 368, नेवासा 106, पारनेर 157, पाथर्डी 120, राहाता 249, राहुरी 136, संगमनेर 128, शेवगाव 53, श्रीगोंदा 86, श्रीरामपूर 225, कॅन्टोन्मेंट 40, मिलिटरी हॉस्पिटल 26, इतर जिल्हा 35 आणि इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
करोना अपड्ेस
बरे झालेली रुग्ण संख्या:1,43,528
उपचार सुरू असलेले रूग्ण:22705
जिल्ह्यातील एकूण मृत्यू:1919
एकूण रूग्ण संख्या:1,68,152