पणजी – गोवा सरकारनेही आपल्या राज्याच्या अखत्यारीत आजपासून 3 मेपर्यंत लॉकडाऊन सुरू केला आहे. कर्नाटकपाठोपाठ लॉकडाऊन उपायाचा अवलंब करणारे ते दुसरे भाजपशासित राज्य ठरले आहे. तथापि, यातून अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना अनुमती देण्यात आली आहे. अन्य खासगी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून पब,कॅसिनो आदी पर्यटकपूरक व्यवसायांना बंदी लागू करण्यात आली आहे.
गोव्याच्या सीमारेषेवरही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून बाहेरील राज्यांतून गोव्यात येणाऱ्यांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तेथे अत्यावश्यक सेवेच्या लोकांनाच ये-जा करू दिली जाणार आहे. बहुतांशी पर्यटनावर अवलंबून असलेल्या या राज्यांतील निर्बंधांमुळे हॉटेल्स व पर्यटनाशी संबंधित सर्वच व्यवसायांवर विपरीत परिणाम होणार आहे. तथापि, राज्यातील वाढत्या करोना संख्येमुळे हे निर्बंध तेथे आवश्यक ठरले आहेत.