श्रीगोंदा – तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब विठ्ठल थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी राजीनामा दिल्याने अध्यक्षपद रिक्त होते.
आज येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात अध्यक्ष निवडीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब थोरात यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एन. बी. मुंडे यांनी दिली.
या निवडीबद्दल राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा, सरपंच मनीषा नाहाटा, उपसरपंच ज्ञानदेव मगर, सुनील पाटील, शिवाजी जाधव, अकबर इनामदार, राहुल गोरखे आदींनी ग्रामस्थांच्या वतीने थोरात यांचा सत्कार केला.