मुंबई – हिंदी सिनेसृष्टी आणि साऊथ सिनेसृष्टीमध्ये केवळ चित्रपटांच्या आशय विषयाचाच फरक नाही तर अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या फॅन फॉलोईंगमध्ये देखील बरीच तफावत आहे. साऊथ अभिनेत्री शोभिता धुलिपाला बद्दलच पाहा ना ही अक्टरेस चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त प्रसिद्ध आहे. म्हणूनच ती तिचे काही फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशात तिने आता इंस्टाग्रामवर तिची आकर्षक शैली दाखवली आहे, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
नागा चैतन्यसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री शोभिता धुलिपालाने आता तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या ग्लॅमरस अंदाजात दिसून येते.याच आकर्षक लूकमध्ये तिने एका कार्यक्रमाला हजेरी देखील लावली आणि पुरस्कार देखील स्वीकारला. शोभिताच्या इंस्टावर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एकापेक्ष एक सुंदर अशा पोस्ट पाहायला मिळतील.
View this post on Instagram
शोभितच्या या फोटोवर फक्त साऊथ फॅन्सच भाळले नाही तर अनेकांनी या अशा हटके लूकमुळेच आपल्याला साऊथ इंडस्ट्री आवडत असल्याच्या कमेंट केल्या आहेत. शोभिता चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचे नाव दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत जोडले गेले होते. मात्र, या दोघांकडूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.मात्र सिनेसृष्टीत याची जोरदार चर्चा आहे.