मुंबई – फॅन्ड्री, सैराट, झुंड अशा दर्जेदार चित्रपट प्रमाणेच नाळ चित्रपट सुद्धा समाजातील प्रश्न उघडपणे मांडणारा होता. अशातच संवेदनशील दिग्दर्शक म्हणजे नागराज पोपटराव मंजुळे यांनी नाळ २ ची नुकतीच घोषणा केली आहे.
त्यांनी फेसबूकवर पोस्ट करत या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. नागराज पोस्ट केली आहे की,’मागच्या महिन्यात सुधाकरने (Sudhakar Yakkanti )अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकायला कधी भेटुयात ? नाळचा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं. पहिल्या “नाळ” प्रमाणेच ‘नाळ’चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे ! “नाळ 2” नावानं चांगभलं !!!’
या पोस्टसोबत त्यांनी फोटोही शेअर केला आहे. ‘नाळ’ या चित्रपटाला अनेक पुरस्कार प्राप्त आणि प्रचंड यश मिळाले आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे आणि देविका दफ्तरदार आणि श्रीनिवास पोकळे प्रमुख भूमिकेत होते.